कल्याण :- ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा “राष्ट्रवादी परिवार, ” संवाद २३ ते २५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कल्याणातील खडक पाडा येथे दिली. केंद्र व राज्य सरकार कडे लवकरच कल्याण – मुरबाड रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागणी लावून धरणार असून जिल्ह्यातील आरोग्य आणि रोजगारासाठी एमआयडीसी स्थापन करावी यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या २३ ते २५ ऑक्टोबर रोजी “राष्ट्रवादी परिवार सवांद दौरा आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकारांना माहिती दिली. केंद्र सरकारने प्रथम राज्यातील राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती चे काम लवकर घ्यावे. केवळ इतके हजार कोटी निधी मंजूर केला याची टिमकी वाजू नये अशी टीका करीत केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समाचार घेत लवकर कृतिशील कामे करण्याची वजा विनंती करीत वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे कार्यकते आणि नागरिक यांच्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा चे आयोजन केले आहे. त्याच बरोबर कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गच्या कामाला सुरुवात करावी तसेच शहापूर मुरबाड कल्याण भागात एमआयडीसी बांधणी करावी.
क्लस्टर योजना ठाणे शहरापूर्ती न ठेवता कल्याण डोंबिवली, उल्हासनगर , अंबरनाथ ,मुरबाड या भागात ही कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले. ३५ सेक्शन शेतकऱ्यांचे शोषण होते यासाठी वन विभागाने हा कायदा रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जाणार आहे. कल्याण तालुक्यात मेडिकल्स कॉलेज व्हावे यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे सांगत सरकार कडे मागणी केली जाणार आहे.
आगामी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याप्रमाणे युती ही होऊ शकते. असे बोलत आम्ही १२२ उमेदवारांची तयारी केली आहे असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी ,वंचित समूह , शेतकरी , राष्ट्रवादी पक्षाला मानणारा वर्ग जोडणार असल्याची ही माहिती प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
-रोशन उबाळे