दुःखातून सावरुन आपल्या लाडक्या मुलांच्या स्मृती प्रित्यर्थ परिजातकांची २६ झाडांची लागवड करीत भविष्यात त्या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळवा. क्राँक्रीटच्या जगंलात नैसर्गिक समतोल साधवा या सामाजिक जाणिवेतून कल्याण मधील जामदार कुटुबीयांनी वृक्षारोपण केले आहे.
कल्याण येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते उल्हास जामदार यांचा २६ वर्षीय मुलगा योगेश याला गेल्या वर्षी कोरोणाची लागण झाली होती. त्याला इतर व्याधी असल्याने त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. मंगळवारी त्याचा २६ वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्मरणार्थ जामदार कुटुंबीयांनी कल्याणात वृक्षारोपण केलें. केडीएमसीच्या बारावे येथील एसटीपी प्लांट परिसरात २६ वृक्षांची जामदार कुटुंबियांनी लागवड करून नैसर्गिक वातावरण जतन होण्यासाठी खारीचा वाटा उचलत एक अगळा संदेश समाजात रूजविला आहे.
-कुणाल म्हात्रे