कोविड मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कल्याण मधील तत्कालीन नगरसेवक कुणाल पाटील हे करणार आहेत. त्याचप्रमाणे कोविड योद्धा सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि गरीब गरजू कुटूंबाना जिवनावश्यक अन्नधान्य देखील वाटप केले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अशातच अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या कुटुंबांना मदत करण्यासाठी कुणाल पाटील फाउंडेशन पुढे आलं असून कल्याण ग्रामीण भागातील कोविड मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत तसेच पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय तत्कालीन नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतला आहे. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोविड योद्धा सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि गरीब गरजू कुटूंबाना जिवनावश्यक अन्नधान्य देखील वाटप केले आहे.
सध्या संपूर्ण जगावर ओढावलेली परिस्थिती अत्यंत वाईट असून कोविडमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अशा कुटुंबांना मदत करून आधार देणे हे आपले कर्त्यव्य असून या कर्तव्यातून आपण हि मदत करत असून इतर नागरिकांनी देखील अशा कुटुंबाना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन तत्कालीन नगरसेवक कुणाल पाटील यांनी केले आहे. यावेळी समाजसेवक अनिल पाटील हे देखील उपस्थित होते.
– कुणाल म्हात्रे