भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत, भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर अनेक मंत्री, खासदार, आमदार यांनी देखील आयुक्तांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. समाजातील सर्वच स्तरातून मनपा आयुक्तचे कौतुक होत असुन कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शनिवारी आयुक्तांची भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील, सचिव रामचंद्र औटी, माजी अध्यक्ष कालीदास कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ माने हे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक करीत कल्याण डोंबिवली शहराची विकास कामांची प्रगती होत नावलैविक वाढेल अशा शुभेच्छा दिल्या.
कल्याण डोबिवली ठेकेदार आसोशियनचे पदाधिकारी सिद्धार्थ माने यांनी सामाजिक बांधलिकितुन तळागाळातील एका कामगाराचा वर्षभरासाठी विमा काढण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक बांधलिकितुन समाजातुन असे नागरिक पुढे येणे हे सकारात्मक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवलीच्या या यशामुळे येथे राबविलेले प्रकल्प पाहणी करण्यासाठी इतर महानगरपालिकांचे आयुक्त देखील येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे