कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील ब प्रभाग क्षेत्रातील कल्याण स्पोर्टस क्लबच्या मागील बाजूस चालू असलेल्या १० चाळीच्या रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी महापालिकेचे पोलिस कर्मचारी व महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १० कामगार यांच्या मदतीने आज केली.
ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व येथील देसलेपाडा, नांदीवली येथे चालू असलेले जी+ 3 या इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई आज केली. सदर कारवाई ई प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागातील २० कर्मचारी व १० पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच १ जेसीबी, ४ कॉम्प्रेसर, गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.
-कुणाल म्हात्रे