कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तरुणांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्षांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
कल्याण डोंबिवलीत तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. त्यातील ७०% ते ८०% घरातील एकमेव कमावते असल्याकारणाने त्यांचा रोज प्रवास किवा रोजगार निमित्त जास्त लोकांसोबत संपर्क येतो. त्यामूळे त्यानां कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्य सरकारने जाहिर केलेल्या नविन नियमावली नुसार फक्त २ डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची मुभा आहे.

या सर्व बाबी लक्षात घेवुन तरुणांना प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून द्यावे असे निवेदन कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा कार्याध्यक्ष यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुक डॉ. विजय सुर्यवंशी यांना दिले. याबाबत आयुक्तांनी लवकरच लसीकरणासाठी एक मोबाइल वॅन उपलबध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.
-कुणाल म्हात्रे
