दुर्गा फाऊंडेशनच्या माध्यमातून पनवेल मधील अत्यंत दुर्गम आदिवासी वाड्यात शेकडो गरीब कुटुंबाला अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या आदिवासी पाड्यातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ होतो किंवा शासकीय योजना यांच्यापर्यंत पोहचतात का ? असा प्रश्न मनात येत असल्याची भावना शोभा भोईर यांनी व्यक्त केली आहे.
पहील्या लॉकडाऊन काळात पिचलेला आदिवासी बांधव अजूनही सावरलेला नाही. मागील कोरोना काळात दुर्गा फाऊंडेशन मार्फत अन्नधान्य,मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले होते. तर दुसऱ्या लॉकडाऊन काळात आदिवासी वाड्यात पुन्हा अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी दुर्गा फाऊंडेशनच्या संथापिका अध्यक्षा शोभा भोईर यांच्या मनात आल्याने त्यांनी आदिवासी भागात अन्नधान्य वापट करून शेकडो गरिबांच्या घराची चूल पेटवून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या मदतीने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
यावेळी दुर्गा फाऊंडेशन संस्थापिका अध्यक्षा शोभा भोईर,रसिका म्हाञे, ज्योती चिवे, सुरेखा माने,सारिका ठाकुर, सिदधी श्रीवास्तव, अश्विनी पाटील आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थिती होत्या.
-कुणाल म्हात्रे