महावितरणचे कोकण प्रादेशिक विभाग कार्यालय तसेच कल्याण परिमंडल कार्यालय याठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयात प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कारण्यात आले. तर कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजवंदन कार्यक्रमानंतर कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्षभर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकदाच हा पुरस्कार कामगार दिनाच्या दिवशी देण्यात येतो. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधामुळे गतवर्षीपासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होत आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे म्हणाले, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे जनमित्र हे ग्राहकांसाठी महावितरणचा चेहरा आहेत. जनमित्रांनी अखंडित वीजपुरवठा, वितरित झालेल्या प्रत्येक युनिट विजेची वसुली, सुरक्षा साधनांचा वापर, पारदर्शक व वेळेवर सेवा या पंचसूत्रीचा उपयोग करावा. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्य अभियंता धंनजय औंढेकर, दिनेश अग्रवाल, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे व दीपक पाटील यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त कर्मचारी – राजेंद्र चौधरी, मंगेश अहिरे, महेंद्र अडके, मिलिंद वाघमारे, मुरलीधर बहिराम, भीमराव तायडे, विश्वास मुकणे, भगीरथ चव्हाण, शनिदास हजारी, बाबासाहेब अहिरे, सविता काटे, गणेश अहेर, उखा बोरसे, नंदू पाटील, दीपक भोईर, सुरेंद्र भोईर, राजू राठोड, सुभाष गायकर, ज्ञानेश्वर गुडूप, मंगेश लोभी, मनोज राठोड, रघुनाथ खंडागळे, देवीप्रसाद सिंग, शिवाजी चव्हाण, जयवंत सांबरे, अनिल लगशेट्टी.
-कुणाल म्हात्रे