कल्याण : महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात मांडा-टिटवाळा येथील ३१ जणांविरुद्ध ८ लाख ४ हजार ४८० रुपयांची ५९ हजार ८५५ युनिट वीज चोरल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकांच्या तपासणी मोहिमेत ८ ऑक्टोबरला ही वीजचोरी उघडकीस आली होती.
दिनेश धर्मा घायवत, शितल विश्वनाथ गांगुर्डे, मोहम्मद याकूब वायलाल, भारती ज्ञानू वरपे, तरुना गौतम प्रधान, विजयदत्त किसन गवळे, नरेश नंदकुमार अमुकर, पदमावती दशरथ पगारे, बळीराम वामन चौधरी, खातुन शहाजान खान, परशुराम यशवंत कुचीकुरे, लक्ष्मण हरी पारधी, आयशा खातून मोहम्मद, के के भोईर, संदिप संभाजी मालेकर, छोटेलाल पी गुप्ता, गणेश अनिल काशिवले, विकास अनिल काशिवले, कोंडु भिल्या काशिवले, स्वप्निल नटूराम मेंढे, विष्णु मोहन धिंडके, प्रकाश जाधव, शितल शांताराम दळवी, निशिगंधा निलेश ताम्हणकर, महिपालभाई पी गांधी, रोहिणी सचिन पगारे, सुमित्रा लक्ष्मीराम, अन्सारी झरीना, बाळु गोविंद गायकर, एम .एस. ओमकार, मयुर विनोद तिवारी (सर्व राहणार मांडा व टिटवाळा परिसर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
संबंधितांकडून मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले होते. सहायक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात संबंधित ३१ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-कुणाल म्हात्रे