pc – रोशन उबाळे
कल्याणमध्ये नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतल असून राहुल रोकडे असं तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीसांनी राहुलला ताब्यात घेतले आहे.
कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु असून शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. विना हेल्मेट कारवाई सुरू असतांना राहुल रोकडे हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता. पटाईत यांनी त्याची गाडी थांबवली, मात्र राहुल ने कट मारत निघून गेला. काही अंतरावर गाडी लावून काही क्षणातच राहुल परत आला. त्याने पटाईत यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णलयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी राहुल रोकडे याला ताब्यात घेतलं आहे.
-कुणाल म्हात्रे
