कल्याण येथील गौरी पाड्यातील केडीएमसी सिटी पार्क परिसरात रविवारी राव सेना सामाजिक संस्थेमार्फत वृक्षरोपणाचा अभियान राबविण्यात आले.
कोरोना काळात ऑक्सीजनचे महत्त्व संपूर्ण जगाला समजले असून ऑक्सीजन न भेटल्यामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे ऑक्सीजन कीती महत्वपूर्ण आहे समजले. या गोष्टी लक्षात घेता रावसेना सामाजिक संस्थेमार्फत केडीएमसी सिटी पार्क परिसरात ३० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमांत रावसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोलराव सोळंके यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षरोपण कार्यक्रम प्रमुख साहिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश आखाडे, संपर्क प्रमुख आशुतोष आहेर, क्रीडा सेना अध्यक्ष निलेश शेलार, कार्याध्यक्ष चंदन वझे, जिल्हा अध्यक्ष तेजस कोंडार, रवी शर्मा, ज्ञानेश ननावरे, शहर अध्यक्ष दीपक बांडे, जयेश मराठे, तनय गायकवाड, वेध मोरे, शुभम चौधरी, दैविक वझे, गितेश शेलार, यश आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
-कुणाल म्हात्रे