दोन कोरोना लस घेण्याऱ्या व्यक्तींना रेल्वे प्रवासात मुभा मिळाल्या नंतर सोमवारी सकाळ पासून पुन्हा नेहमी सारखी होणारी गर्दी दिसू लागली आहे. सीट मिळण्यासाठी तारेवरची कसरत करताना रेल्वे प्रवाशी दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कोविड वैक्सीन च्या दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांनंतर १५ ऑगस्ट रोजी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे.
सोमवार सकाळ पासून रेल्वे गाड्यात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे लॉकल गाड्या त्यात ती जलद असो किंवा सर्व ठिकाणी थांबणाऱ्या गाड्या असो सर्वात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पतेती सरकारी सुट्टी असून ही सोमवारी कल्याण- डोंबिवली, दिवा, बरोबर सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची लगबग दिसून आली होती. अन्य प्रवासात होणारा वाढीव खर्च पाहता बचत होत असल्याने प्रवाश्यात आनंदा चे वातावरण पसरले होते . दरम्यान त्यामुळे रेल्वे स्थानक अधिकारी यांच्या कडून मंगळवारी यापेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे आज देखील तोब्बा गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.
-रोशन उबाळे
