शंभुदुर्ग प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा या संस्थेने सामाजिक वारसा जपत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या शेरे व वेहले या गावालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वृक्षलागवड कार्यक्रमात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील संस्थेच्या शेकडो कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शेकडो झाडांची लागवड केली.
शिवभाळू, जांभूळ, आपटा,चिंच, गुलमोहर, आणि धामण आदी प्रकारची झाडांची लागवड केली असून या झाडांचे संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली असल्याचे संस्थेचे संस्थापक आदेश चौधरी यांनी सांगितले. शंभुदुर्ग प्रतिष्ठाण ही संस्था स्थापना काळापासून संपूर्ण ठाणे जिल्हात सतत दुर्गसंवर्धन, सामाजिक उपक्रम, आपत्कालीन मदतीचे उपक्रम,तसेच धार्मिक उपक्रम राबवत असल्याने संस्था कार्याची दखल घेऊन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी संस्थेच्या संपूर्ण कार्यकारणीला सन्मानचिन्ह देऊन गौरविले.
-कुणाल म्हात्रे