घडामोडी

वेहळे व रायते येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख व हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे कल्याण तालुका ग्रामीण प्रमुख वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण भागातील वेहळे व रायते गावातील कार्यकर्त्यांनी शिवबंधन हातात बांधून, शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.                                      

यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुषमा लोणे, सदस्य जयश्री सासे, शिवसेना महीला तालुका अध्यक्ष मिनाक्षी जाधव, जिल्हा सचिव अँड अल्पेश भोईर, तालुका संपर्क प्रमुख रमेश बांगर, बाजार समितीचे संचालक भूषण जाधव, पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचौरे, सुनील जाधव, तालुका ग्रामीण सचिव नामदेव बुटेरे, नरेश सुरोशी, बाळू गोरे, अशोक श्रीवास्तव, समीर शेलार, नितीन देसळे, प्रकाश चौधरी, सतीश चौधरी, शाखा प्रमुख भास्कर टेंभे, आश्विन वाघेरे, प्रविण भोईर, योगिता चौधरी,युंगधरा चौधरी, लक्ष्मण भोईर आदि उपस्थित होते.     

     वेहळे गावातील कार्यकर्ते लहू देसळे, आंनता देसळे, बाळा देसळे यांच्या प्रयत्नामुळे सुधीर देसळे, बाळाराम देसळे, संतोष आव्हाड, सुनील देसळे, विष्णू देसळे, रंगनाथ देसळे, सोमनाथ देसळे, देवेंद्र पागार आदि कार्यकर्ते तसेच रायते गावातील संतोष सुरोशी, महेंद्र जाधव, सुभाष जाधव यांच्या प्रयत्नामुळे रायते गावातील कार्यकर्ते प्रशांत घाडगे, राज पवार, धिरेद रावत, प्रतिक पाळ, राजीव सिंग, विश्वास सिंग, अरविंद पाल, सलमान शेख, दिपक मिस्त्री, उल्हास धगे, शंकर जेडीया, दिलीप शेलार, महेश पवार, तेजस पवार, शैलैश कोर, दिपक झा आदि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले आहे.

            यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी सांगितले की रायते व वेहळे गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल, कोरोना कालावधीत प्रवेश प्रक्रिया थाबविणयात आली होती, परंतु आता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, शिवसेनेची कल्याण ग्रामीण नवीन कार्यकारणी लवकरच निवडली जाईल असे सांगितले.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *