कल्याण : शेअर रिक्षा सर्वेक्षण, निश्चित भाडेदर, आक्षेप हरकत, त्रुटी दुरूस्ती, काही रूट वर पुर्नसर्वेक्षण तसेच सन २०१५ पूर्वी प्रमाणे निश्चित भाडेदर, महत्वाचे प्रवासी टप्पे या प्रमाणे अंतिम दरपत्रक सादर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेअर ऐ रिक्षा भाडे दर निश्चिती पहीला टप्पा सर्वेक्षणात ९ रूपये ३१ पैसे होत असतांना ९ रूपये प्रतिप्रवासी निश्चित केलेली आहे. प्रवाशांना शेअर रूटवर सहजरित्या रिक्षा उपलब्धता व सुट्टे पैसे चणचण व देवाण घेवाण या वरून वादविाद टाळणे याकरीता पहिला टप्पा प्रतिप्रवासी १० रूपये अशी निश्चित करावी असे व्यवहारीकदृष्टया रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. शेअर ऐ रिक्षा भाडेदर अंतिम भाडेदर सुची जाहीर करतांना प्रत्येक रूटवर जास्त प्रवाशांचे संख्या असलेले टप्पे यादीत घ्यावे. सन २०१५ पुर्वीची शेअर रिक्षा दरपत्रक सुची वाचन व आकलन करावे.
गेली ६ वर्ष रिक्षा चालकांना भाडेवाढ मिळाली नव्हती. नवीन भाडेवाढ जाहीर होवून एक वर्षानंतर सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. रिक्षा दुरूस्ती खर्च टायर टयुब पंक्चर व सि. एन. जी. दरात प्रचंड दरवाढ झालेली आहे. कल्याण आर.टी.ओ. कार्यक्षेत्रात रिक्षा व्यवसाय संपुर्ण रेल्वे प्रवाशांवर व सकाळी स्टेशनकडे व सायंकाळी स्टेशनकडुन इच्छित स्थळी असा वनसाईड आहे. त्यामुळे पत्राची योग्य दखल घेवुन अंतिम रिक्षा भाडेदर पत्रक जाहिर करण्यापुर्वी रिक्षा चालक प्रतिनिधी रिक्षा संघटना यांच्याशी चर्चा विनीमय करून जुने सन २०१५ पुर्वीचे दरपत्रक आकलन करून अंतिम दरवाढ जाहीर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे केली आहे.
-कुणाल म्हात्रे