सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू देण्याची मागणी मनसेने केली असून कल्याण मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी याबाबत मध्य रेल्वेच्या क्षेत्र अधिकारयांना, कल्याण स्टेशन अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, रेल सुरक्षा बळ यांना निवेदन दिले आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करू न दिल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कोरोना काळात सावधगिरी म्हणून सरकार तर्फे सर्वात आधी उपनगरीय लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आणि नंतर अतिआवश्यक सेवे करीता सुरु ही करण्यात आल्या. सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच उपनगरीय गाड्यात प्रवास करू शकतात. आता सर्व काही पूर्व पदावर येत असतानाही, सामान्य प्रवाश्याना उपनगरीय गाड्यात प्रवेश नाही, म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच काम करीत आहेत बाकीच्या लोकांनीं घरी बसायचा का असा सवाल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.
सामान्य जनता लाचार झाली असून आता पाणी डोक्याच्या वर जात आहे. ज्या लोकांनी एक किंवा दोन्ही लस घेतलेल्या आहेत त्यांना तरी प्रवाशाची मुभा देण्यात यावी. जर येत्या दोन तीन दिवसात सामान्य प्रवाश्याचा विचार नाही केला गेला तर, मनसे तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जवाबदारी रेल्वेची असेल असा इशारा भोईर यांनी दिला आहे.
-कुणाल म्हात्रे