सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास “एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं” ही मोहीम घेऊन निघालेल्या सिद्धार्थ गणाईचे आज कल्याणामध्ये आगमन झाले असून त्याच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कल्याणनजीक असलेल्या बापगावच्या सरपंचांच्या हस्ते या मोगली सफर चा सत्कार करण्यात आला.
या धाडसी प्रवासच कौतुक करत ह्या तरुण वयात ही जाणीव घेऊन एक पाऊल उचलण खूप मोठी गोष्ट असून सिद्धार्थ ने जे काम हाती घेतले आहे त्या कामाला आमचा पाठींबा असल्याचे सरपंचांनी सांगितले. तसेच याठिकाणी गणाई परिवारातील ज्योती निकाळजे व तमाम सदस्य आणी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यादेखील उपस्थित होत्या.
एक 22 वर्षीय पछाडलेला तरुण त्याच्या स्वप्नांना साकार करत एक सामाजिक जाणिव घेऊन रायगडच्या पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून हिमालयाच्या दिशेने चालत निघाला आहे. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी मी एक हा छोटा प्रयत्न करत आहे. आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. असे सिद्धार्थ गणाई यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे