खेदजनक : गेट उघडण्यास उशीर झाला म्हणून बुलेटच्या चैनने वोचमनला मारहाण

सोसायटीचे गेट उशिरा घडल्याचा रागातून एका तरुणाने वोचमनला बुलेटच्या चैनने मारहाण केल्याची खेदजनक घटना कल्याण मध्ये घडली आहे. कल्याण पूर्व चिंचपाडा रोड भागातील रंजना अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली आहे.

रंजना अपार्टमेंटमध्ये राहणारा स्टॅलिन नावाचा इसम दररोज रात्री उशिरा मध्यपान करून येत होता. यामुळे वोचमनला गेट उघडण्यास उशीर झाला होता. या रागातून रात्री स्टॅलिनने वोचमन मुकेश थापा यास शिवीगाळ केली होती. यानंतर सकाळी त्याने रात्रीचा राग काढण्यासाठी या वोचमनला चक्क बुलेटच्या चैनने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याची आई मध्ये येत होती मात्र तो तिलाही जुमानत नव्हता. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पसरत असून स्टॅलिन सारख्या प्रवृत्ती बद्दल कठोर भूमिका घ्यावी असे म्हटले जात आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या व्हिडीओची दखल घ्यावी अशी मागणी समाजा कडून व्यक्त केली जात आहे.

पहा या घटनेचा व्हडिओ :-

कल्याणचा आणखी एक महत्त्वाचा पुल होणार लोकांसाठी खुला ; ३१ मे ला मुख्यमंत्री करणार ऑनलाइन लोकार्पण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुलांचे काम सुरू होते. पत्रिपुलानंतर काही पुल सुरू झाले त्यातीलच एक महत्त्वाचा असलेला नवा दुर्गाडी पुल हा ३१ मे पासून लोकांच्या सेवेत येणार आहे. या पुलाची एक मार्गिका खुली केली जाणार आहे.

नवा दुर्गाडी पुल हा ठाणे मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पुल आहे. कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच आंबिवली व टिटवाळा भागातील नागरिकांना मुंबईला जाण्याचा हा उपयुक्त मार्ग मानला जातो. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध तांत्रिक,नैसर्गिक व बेजबाबदारी सारख्या कारणांमुळे काम रखडत होते. त्यानंतर एमएमआरडीए प्रशासनाने नव्या कंत्राटदारा मार्फत पुलाच्या कामाला गती दिली.

सोमवार दि.३१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केले जाणार आहे. या पुलावरील एक मार्गिका जूनच्या सुरुवातीलाच खुली होणार आहे. या मार्गिकेमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो. कल्याण शहरात सुरू असलेल्या विविध पुलांच्या कामामुळे हे शहर वाहतुकीच्या विळख्यात होते. त्यातच पत्रिपुलानंतर हा पूल सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण काहीसा कमी होणार आहे.