Kalyan Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. निवडणूक आयोगाने २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिला आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी कल्याण पूर्व महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. […]
होम
कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांना मिळणार गती ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशीर्षअंतर्गत (२२१७-०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. सदर कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका […]
कल्याणचा आणखी एक महत्त्वाचा पुल होणार लोकांसाठी खुला ; ३१ मे ला मुख्यमंत्री करणार ऑनलाइन लोकार्पण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुलांचे काम सुरू होते. पत्रिपुलानंतर काही पुल सुरू झाले त्यातीलच एक महत्त्वाचा असलेला नवा दुर्गाडी पुल हा ३१ मे पासून लोकांच्या सेवेत येणार आहे. या पुलाची एक मार्गिका खुली केली जाणार आहे. नवा दुर्गाडी पुल हा ठाणे मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पुल आहे. कल्याणसह उल्हासनगर, […]
भीमजयंती निमित्त समाजसेवकाने बेघरांना वाटले अन्नधान्य आणि भाजीपाला
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांनी चिंचपाडा गावाजवळील शंभर फुटी रोड लगत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप केले. या वेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले त्याचप्रमाणे बुद्ध वंदना करण्यात आली. गेली २५ वर्षे झोपड्यांमध्ये राहणारे याच देशातील […]