कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण पूर्वेत कल्याण विकासिनी मार्फत आरोग्य शिबीर आणि रोजगार मेळावा संपन्न

कल्याण : कल्याण विकासिनी व वीरशैव लिंगायत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मा.नगरसेवक उदय रसाळ यांच्या मार्फत आरोग्य शिबीर व रोजगार मेळाव्याचे आयोजन आज कल्याण पूर्वेत करण्यात आले होते. कोळसेवाडी प्रभागातील नागरिकांनी या शिबिरात प्राथमिक आरोग्याची तपासणी करून घेतली. यात ECG, ब्लडप्रेशर, हृदय तपासणी, रक्त तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले.

आरोग्य शिबीरा बरोबरच बेरोजगार तरुणांसाठी, मॅजिक बस या संस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉईमेंट लिंक स्किलिंग प्रोग्राम च्या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणीची नोंदणी करून घेण्यात आली आहे. रोजगारासाठी आवश्यक स्किल ट्रेनिंग संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. असे ही उदय रसाळ यांनी सांगितले. या शिबिराला असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला.

शिबिरासाठी सहकार्य करणारे डॉ. गुप्ता, वीरशैव लिंगायत समाज कल्याण या संस्थेचे सचिव जितेंद्र लिगाडे, मॅजिक बस चे समन्वयक प्रदीप सोनावणे, कल्याण विकासिनीचे अजित शिंदे, राकेश गायकवाड, गोविंद लहाने, संजय केदारे, अनिल सुरळकर, दिनेश भागवत यांनी विशेष सहकार्य केले. असे लोकोपयोगी उपक्रम आम्ही नेहमी राबवित राहू अश्या भावना याप्रसंगी मा.नगरसेवक उदय रसाळ यांनी व्यक्त केल्या.

संतोष दिवाडकर

A health camp and employment fair was held in Kalyan East through Kalyan Vikasini

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *