विठ्ठलवाडी : भारतीय जनता पार्टीच्या BJP Kalyan शहर कार्यकारिणी सदस्य तसेच समाजसेविका अमृता विशाल जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ साईनगर शनीनगर भगवान नगर येथे नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. या निमित्ताने प्रभागातील अनेक नवतरुण आणि युवतींनी या अभियानाचा लाभ घेत आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी अर्ज सादर केला. प्रभागातील तरुणांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही भक्कम राहण्या करिता आपले अमूल्य योगदान द्यावे हा या मागचा मुख्य हेतू असल्याचे कल्याण शहर उपाध्यक्ष संदीप राजाराम जाधव यांनी सांगितले.
विठ्ठलवाडी येथील संदीप जाधव यांच्या कार्यालयात हे अभियान राबविण्यात आले होते. प्रभागातील असंख्य युवकांनी आपली मतदार नोंदणी करवून घेतली. मागील ३ वर्षात जवळपास २५०० नवीन युवा मतदारांचे ओनलाईन पद्धतीने मतदाना मध्ये नावे समाविष्ठ करुन देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मतदार ओळ्खपत्रातील दुरुस्ती प्रक्रिया देखील या दरम्यान अनेकांची करण्यात आली असल्याचे समाजसेविका अमृता विशाल जाधव यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षांपासून आम्ही प्रभागात कार्यरत असून समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. कोरोना काळातही फ्रंट लाईन वर येऊन काम केले असून समाजाचे देने लागतो ही बाब डोळ्यासमोर ठेऊन समाजसेवा अविरत सुरू ठेवली असल्याची भावना समाजसेविक संदीप राजाराम जाधव यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. तसेच या नंतरही प्रभागात सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी अमृता जाधव यांच्या कडून सांगण्यात आले. याबाबत प्रभागातील नागरिकांनी देखील अमृता विशाल जाधव तसेच संदीप राजाराम जाधव यांचे आभार मानले.
-संतोष दिवाडकर