कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण पूर्वेच्या गणेश टेकडीचा होणार कायापालट

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग ५ ड कार्यालयाच्या मागे असलेल्या टेकडी वरील गणेश मंदिर तसेच टेकडीच्या सुशोभिकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन पूजा पाठ करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

गणेश टेकडी कल्याण पूर्व महानगरपालिका ड प्रभागाला लागून आहे. याच टेकडीवर सुमारे दीडशे वर्षांपासून गणपती विराजमान असल्याचे सांगितले जाते. शहरीकरण होण्यापूर्वीच्या कल्याणची साक्ष देणारी नेतीवली प्रमाणेच ही देखील एक टेकडी असल्याचे मानले जाते. मात्र मागील काळात या टेकडीवर अपप्रवृत्तीचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले होते. या टेकडीवर अश्लील चाळे, गर्दुल्ल्यांचे अमली पदार्थांचे सेवन, मद्यसेवन, चोरी, लूटमार, परिसरातील लोकांच्या घरावर दगडी मारणे अशा घटना घडत होत्या.

अलिकडल्या काळात गणेश टेकडी आपले रूप पालटत असून मंदिर परिसराचे देखील सुशोभीकरण होणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेकरांसाठी हा परिसर धार्मिक तसेच ज्येष्ठ नागरिक व शहरवासीयांना या उंच ठिकाणी विरंगुळा मिळणार आहे. कधी नव्हे ते टेकडी परिसर सर्वांसाठी सुरक्षित प्रेक्षणीय स्थळ होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनाही आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

संतोष दिवाडकर

Ganesh hill of Kalyan East will be transformed

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *