Ravindra Chavan : रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री Ravindra Chavan यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला होता. मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.
भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दर्शवले.
भाजपच्या १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये हा मेळावा संपन्न झाला. निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
Minister Ravindra Chavan delivered a speech