कल्याण-डोंबिवली घडामोडी

रतन टाटांच्या निधनानंतर आज Namo Ramo Dandiya रास गरबा बंद ठेवण्याच्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचना

Namo Ramo Dandiya : शहरात सर्वत्र नवरात्रीनिमित्त दांडिया उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासरंग उत्सवाच्या माध्यमातून उत्सव भरवला आहे. दोन्ही ठिकाणी अफाट गर्दी होत असून नवरात्र उत्सवप्रेमी नागरिकांमध्ये त्यामुळे जल्लोष, उत्साहाचे वातावरण आहे.

महायुतीचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आदी मान्यवरांनी काल नमोरमो नवरात्र उत्सवात येऊन देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. मागील आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील नमोरमोमध्ये येऊन आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रासरंग नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी जाऊन उत्सवाचा आनंद लुटला होता. एकूणच महायुतीने शहरात सुरू केलेल्या या भव्य उत्सवाची चर्चा राज्यभर सुरू असून सर्व देविभक्तांना त्यातून आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया सहभागी भक्तांमधून व्यक्त झाली.

भारताचे अनमोल रत्न रतन टाटा यांचे रात्रीच्या दरम्यान दुःखद निधन झाले. यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार असून शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार आज शासनाचे कोणतेही सांस्कृतिक अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्या निधनानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा हळहळ केली असून आजच्या दिवशी नमो रमो मध्ये गरबा रद्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून फक्त देवीची आरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Minister Ravindra Chavan’s instructions to close Namo Ramo Dandiya Ras Garba today after Ratan Tata’s death

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *