घडामोडी

Purple cap winners : आयपीएलची पहिली पर्पल कॅप पाकिस्तान मध्ये

Purple cap winners : आयपीएल २०२४ ला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत कोणता संघ, खेळाडू चांगली कामगिरी करणार याचे अंदाज बांधले जात आहेत. याकरिता आयपीएल दोन मानचिन्ह देते. सर्वाधिक धावा करणारा ऑरेंज कॅप तर सर्वाधिक बळी घेणाऱ्याला पर्पल कॅप दिली जाते. याच कॅप मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये मोठी चुरस लागते. मात्र तुम्हाला माहित आहे का आयपीएलची पहिली पर्पल कॅप पाकिस्तान मध्ये आहे ते?

भारताच्या आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील आयपीएलची पहिली कॅप ही पाकिस्तानमध्ये आहे. २००८ साली आयपीएलला सुरुवात झाली होती. आणि पहिल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानचे खेळाडू विविध संघांत सहभागी झाले होते. पाकिस्तानचा त्यावेळेसचा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर हा राजस्थान रॉयल्स कडून खेळत होता. संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करून त्याने २२ बळी टिपले आणि पर्पल कॅप पाकिस्तानात नेली. तन्वीरच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्स संघाने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मात्र यानंतर मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची आयपीएल मधून हकालपट्टी करण्यात आली.

आयपीएल खेळलेले पाकिस्तानी खेळाडू

१) सोहेल तन्वीर – राजस्थान रॉयल्स (₹४०.१६ लाख) Purple cap winners

२) कमरान अकमल – राजस्थान रॉयल्स (₹६० लाख)
३) युनिस खान – राजस्थान रॉयल्स (₹९०.३६ लाख)
४) मोहम्मद हाफिज – कोलकाता नाईट राईडर्स (₹४०.१६ लाख)
५) सलमान बट – कोलकाता नाईट राईडर्स (₹४०.१६ लाख)
६) शोएब अखतर – कोलकाता नाईट राईडर्स (₹१.७ करोड)
७) शोएब मलिक – दिल्ली डेअरडेविल्स (₹२ करोड)
८) मोहम्मद असिफ – दिल्ली डेअरडेविल्स (₹२.६१ करोड)
९) मिसबाह उल हक – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (₹५०.२ लाख)
१०) शाहिद आफ्रिदी – डेक्कन चार्जर्स हैदराबाद (₹२.७१ करोड)

Purple cap winners : First Purple Cap of IPL is in Pakistan

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *