Shahad News : कल्याण पश्चिमेतील शहाड परिसरातील आंबिका नाला हा अरुंद आहे. तसेच या भागात नाल्यावर बेकायदा बांधकामे झाली असल्याची ओरड आहे. ९ जून रोजी पहिल्या पावसाचा फटका शहाड परिसराला बसला. या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकार्याने एक बॅनर आंबिकानगर येथे लावला आहे. त्यावर आधी प्रश्न सोडवा. मग मते मागायला या असे लिहिले आहे. स्थानिक नगरसेवकाला कानपिचक्या देत हा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.
मनसेचे पदाधिकारी पंकजराजे पाचपिंडे यांनी हा बॅनर लावला आहे.९ जून रोजी नाल्याचे पाणी तुंबले व ते रस्त्यावर कसे साचले? त्यात वाहने कशा प्रकारे अडकली? याचे फोटोही बॅनरवर लावले आहेत. तासाभराच्या पावसाने ही अशी स्थिती उद्धवते. आधी प्रश्न सोडवा। मगच मते मागायला या. प्रश्न सोडविला नाही तर मते मिळणार नाहीत असा इशारा राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींना दिला आहे. त्यामुळे या फलका मुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
-रोशन उबाळे
Shahad News: ‘First solve the problem, then come to ask for votes’ – MNS banner to local corporator