KDMC : कल्याण डोंबिवली महपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सद्या मोठ्या चर्चेतील विषय बनला आहे. पालिका प्रशासनाची आरोग्य व्यवस्था अकार्यक्षम असल्याचा आरोप आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. मात्र पालिका प्रशासन या सर्व आरोपांचे खंडण वेळोवेळी करीत असून आमची आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे परिपत्रक काढून सांगत आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गीता हरिकिसनदास रुग्णालयात जाणीव सामजिक संस्थेचे पदाधिकारी समाजसेवक प्रथमेश सावंत यांच्या पुढाकाराने ठिय्या मांडून बसले असून काही वेळापूर्वी महापालिका वैधकिय अधिकारी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उस्थित राहिले होते.
महानगरालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे आरोप राजकीय पक्षांमार्फत देखील करण्यात आले असून मनसेने ट्रॉफी देऊन आंदोलन केले होते. या अगोदर एका महिलेची पालिका रुग्णालयाच्या दालनात प्रसृती झाल्याने महानगरपालिका प्रशसनावर टीकेची झोड उठली होती.
शासकीय रुग्णालयात रुग्णांना लागणारे औषध गोळ्यांचा अपुरा पुरवठा, उपलब्ध नसलेले इंजेक्शन, अपुरे मनुष्बळ, उपचारासाठी कळवा येथे पाठविणे अशा अनेक कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागावर सवाल उपस्थित केले जात असून त्यांचे खाजगी रुग्णालयाशी हितसंबंध आहेत असेही आरोप सामान्य नागरिक करू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील गीता हरिकिसनदास रुग्णालयाच्या कारभारा विरोधात समाजसेवक प्रथमेश सावंत यांनी ठिय्या मांडला असून जोपर्यंत समाधानकारक उत्तर दिली जात नाही तोवर इथून हटणार नाही असे सावंत यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी देखील अधिकाऱ्यांना सवाल उपस्थित केले. जनतेकडून आरोग्य सेवेचा कर घेता मग परिपूर्ण सेवा का देत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
-संतोष दिवाडकर
Social workers organized against KDMC health department