कल्याण-डोंबिवली घडामोडी

“किती भ्रष्टाचार करायचा काय लिमिट? कमी पडले असेल तर घ्या” – मनसेच्या राजू पाटलांनी खिशातून काढल्या नोटा

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले. […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

लोकसभेत राजू पाटील यांनी केला शिवसेनेचा जोरदार प्रचार; विधानसभेत शिवसेनेने उभा केला पाटलांविरोधात उमेदवार

राजू पाटील : मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्याच राजू पाटलांविरोधात शिवसेनेने अमित ठाकरेंपाठोपाठ आता राजू पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे यांना […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नाही; त्यांनी महापौर बसवण्याची स्वप्न पाहू नये; Raju Patil यांचा टोला आणि त्याला भाजप आमदारांचे समर्थन

Raju Patil : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आपला महापौर बसवण्याची तयारी करीत आहे याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नसून त्यांनी महापौर बनवायच्या वलग्ना करूच नये अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर यावर कल्याण पूर्व […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

मनसेच्या चिकणीपाडा जनसंपर्क कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा संपन्न

कल्याण :- कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा आज पार पडला. मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या विध्यमाने शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. आज कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मनसे उपविभाग […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

Raju Patil : शिवसेनेने स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा मनसे आमदाराचा आरोप

कल्याण :- मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे मनपाने आज जाहीर केले आहेत. मात्र या प्रभाग रचनेवर राजकीय नेत्यांसह काही सर्वसामान्य नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. कल्याण डोंबिवली मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली मधील काही नागरिकांनी नकाशे प्रभाग रचना पाहून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

KDMC च्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल; मनसे आमदार राजू पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

कल्याण : बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सत्ताधारी पक्षाला याबाबत सवाल केले आहेत. क.डों.म.पा. (KDMC) चे माजी आयुक्त […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

‘अहो नगरसेवक कोणे ?’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या समोर राजू पाटील यांनी व्यक्त केला मनसे नगरसेविकेचा अभिमान

उल्हासनदी बचाव मोहिमेला सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर यांच्याशी उल्हासनदी प्रश्नावर चर्चा केली. शिवाय मनसे पक्षाचा जाहीर पाठिंबा देखील दर्शवला. मनसे आमदार राजू पाटील यांच्या समवेत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. याच वेळी जवळच्याच भागातील मोहने कोळीवाडाच्या […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

‘…अन्यथा कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात’ – मनसे आमदार राजू पाटील

उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले […]

कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण – डोंबिवलीचे उत्तर आठ दिवसांत देणार – अविनाश जाधव ,मनसे जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत […]