Vaibhav Gaikwad : शहरात अलिकडल्या काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढीस लागली आहे. मागच्या काळात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात व्यसनाधीनता कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही बाब लक्षात घेत नुकतेच भाजपचे युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष पद स्वीकारलेले वैभव गायकवाड VaibhavGaikwad यांनी याच मुद्द्यावर आता काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड VaibhavGaikwad यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लागल्यानंतर पुढे कोणते कामकाज असणार आहे याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राजकारणा पलीकडील अनेक सामाजिक मुद्द्यांवर हात घातला.
कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड VaibhavGaikwad हे तरुण वयात आल्यापासूनच सामाजिक क्षेत्रात उतरले होते. आता त्यांची राजकारणात खऱ्या अर्थाने एन्ट्री झाली असली तरी सुरुवातीलाच त्यांनी सामाजिक विषयांवर आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. शहरातील तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली असून त्यातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. या तरुणांना यातून बाहेर काढून त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन उपलब्ध करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात मोठ्या पदावर वर्णी लागल्यानंतर त्या पदाला अनुरूप असे काम करण्यावर वैभव गायकवाड VaibhavGaikwad यांचा कल असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे.
–संतोष दिवाडकर
VaibhavGaikwad efforts to get the young generation out of addiction