मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शेकडो उत्तर भारतीयांचा भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली : शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चव्हाण यांच्याच हस्ते प्रवेश करण्याच्या त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव राज्यभर प्रचारात व्यस्त असलेले मंत्री चव्हाण हे त्या सगळ्यांसाठी आवर्जून उपस्थित राहिले होते.

मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक, सरचिटणीस नंदू परब यांनी दिली. त्यामध्ये प्रमुख अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश, विश्वकर्मा श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा, दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा, अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा, अभिषेक सोनू, अभिषेक सिंह, नवीन शर्मा, विकास प्रजापती, दर्शन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, दत्ता माळेकर, रवीसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर मीतेश पेणकर बाळा पवार उपस्थित होते. नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे यांनी या प्रवेश संदर्भात काही महिने विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी या सगळ्यांचे विशेष कौतुक केले. संघटना मजबुतीसाठी हे महत्वाचे पाउल असून आलेल्या सगळ्यांचे स्वागत असून पक्षात एकदिलाने काम करून शतप्रतिशद भाजप हे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

Hundreds of North Indians join BJP in Dombivli in the presence of Minister Ravindra Chavan

कल्याण पूर्वेत राज ठाकरेंचं दुर्लक्ष? मनसे का देत नाहीये इथे तगडा उमेदवार?

MNS Kalyan East : कल्याण पूर्व मतदारसंघात मनसे कडून उमेदवार दिला जात नाही अशी गरळ नेहमीच ऐकावयास मिळते. याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच नाराजी देखील असते. त्याचबरोबर या भागातील मतदार देखील राज ठाकरेंच्या भूमिकेवर अंतर्गत नाराजी व्यक्त करतात. कल्याण पूर्वेच्या जागेसाठी मनसेचे काही बडे नेतेच समझोता करतात अशाही चर्चा आजवर ऐकायला आल्या आहेत.

२००९ साला पासून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाड हे आमदार आहेत. राज ठाकरेंची प्रचंड ताकद आणि हवा असतानाही त्यांनी २००९ साली कल्याण पूर्वेत मनसेचा उमेदवार का दिला नाही हा प्रश्न आजही अनेकांच्या मनाला लागून आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेला भरघोस मतदान होत असतानाही मनसेने तेव्हा जागा का लढवली नाही असा सवाल आजही उपस्थित केला जातो.

२०१४ साली मनसेकडून मोरेश्वर भोईर हे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत होते. मात्र अचानकपणे हे तिकीट मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांना देण्यात आले. याचा सर्वाधिक फायदा अनपेक्षितपणे अपक्ष व स्थानिक उमेदवार गणपत गायकवाड यांना झाला. मतदारसंघात त्यावेळी अधिक नावलौकिक नसलेल्या नितीन निकम यांना सात हजारहून अधिक मतदान झाले होते. मोरेश्वर भोईर यांना उमेदवारी मिळाली असती तर कदाचित या मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते अशीही चर्चा होती. यानंतर भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकला.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा कल्याण पूर्वेत उमेदवार न देण्याचे ठरवले. यामुळे मनसेला मतदान करणाऱ्या मतदारांना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष सोडून वेगळा उमेदवार अथवा इतर पर्यायाचा विचार करावा लागला होता. आता २०२४ च्या निवडणुकीतही मनसे पक्षातर्फे उमेदवार अजूनही दिला जात नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. कल्याण पूर्वेत मनसे प्रत्येक निवडणुकीत का कमीपणा घेते? असा सवाल आता पुन्हा पडला असून याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का? असाही प्रश्न काही राजकीय जाणकार करीत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यात मतदार दिला जातो मग मनसेची ताकद बऱ्यापैकी असलेल्या राजू पाटलांच्या शेजारील मतदारसंघात उमेदवार का दिला जात नाही? किंवा राजू पाटील कल्याण पूर्वेसाठी मनसेचा सक्षम पर्याय का शोधत नाही? असा सवालही या ठिकाणी उपस्थित केला जातो. तर दुसऱ्या बाजूला कुंपणच खातंय शेताला आणि बुजगावणेही फितूर अशी म्हण देखील या मतदारसंघासाठी बोलण्यात येते.

-संतोष दिवाडकर

Why is Raj Thackeray neglected Kalyan East?

Mahim Vidhansabha : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या सुपूत्रासाठी राज ठाकरेंनी केली होती मदत; आता त्यांच्याच सुपुत्रा विरोधात दोघांनीही दिले उमेदवार

Mahim Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे उमेदवार आता जवळपास निश्चित होऊ लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीसह मनसेने देखील आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मनसेने पहिल्यांदाच अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांना माहीम विधानसभेतुन उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या समोर दोन्ही शिवसेनेने आपआपले उमेदवार दिले आहेत.

मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण मधून निवडणूक लढवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतली होती. मात्र आता राज ठाकरेंच्या सुपुत्रा विरोधातच एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभेत सदा सर्वणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेत अंशतः नाराजी पहायला मिळत आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील वरळीतुन प्रथमच उमेदवारी लढत होते. त्याही वेळेस राज ठाकरेंनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. आता २०२४ विधानसभेला राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे देखील प्रथमच निवडणूक लढत आहेत. राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे राजकारणापलीकडे जाऊन नात्याला महत्त्व दिले त्याची परतफेड करण्याची संधी मात्र उद्धव ठाकरेंनी गमावली. यामुळे मनसे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही शिवसेने विरोधात रोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे.

Mahim Vidhansabha: Raj Thackeray helped for the son of Uddhav Thackeray and Eknath Shinde; Now he has given his candidate against the son of Raj Thackeray

मंत्री रवींद्र चव्हाणांना डोंबिवलीतुन तिकीट कन्फर्म ; BJP चा Dombivli बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा निर्धार

BJP Dombivli : विधानसभा निवडणूका जाहिर झाल्या आहेत. त्याचबरोबर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपने अधिकृतपणे उमेदवारी देखील जाहीर केली आहे. आजपर्यंत पक्षाला विजयश्री मिळवून देण्यासाठी भाजपचे शेकडो पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, आजी माजी जिल्हाध्यक्ष ज्यांनी कल्याण, डोंबिवलीसह जिल्ह्यात भाजप रुजवला, वाढवला अशा सर्वांचा डोंबिवलीत ब्राह्मण सभा येथे रविवारी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी डोंबिवली बालेकिल्ला अभेद्य राहील असा निर्धार सर्व ज्येष्ठ मंडळींनी केला.

भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की, जिथे कार्यकर्त्याचा सन्मान होतो. कै. रामभाऊ म्हाळगी, दिवंगत नायब राज्यपाल राम कापसे, स्व. दिगंबर विशे, स्व.संत, स्व.कांतबाबू आपले माजी मंत्री जगन्नाथ पाटील, संजय केळकर, पद्माकर कुलकर्णी, यांच्यासह के आर जाधव, शशिकांत कांबळे, विद्यमान अध्यक्ष नाना सूर्यवंशी आदींचे पक्षासाठी योगदान खूप मोलाचे असल्याचे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. या सगळ्यांनी पक्षाला बळकटी दिली. शून्यातून पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आता पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत, त्यांच्या कष्ट, पक्षाविषयी प्रेम, आदर, आपुलकी, एकीला माझा सॅल्युट अशा शब्दात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ मंडळींचे योगदानाबद्दल आदर व्यक्त केला. ज्यावेळी ही सगळी मंडळी झटत होती तो काळ प्रतिकूल परिस्थितीचा होता, हे इतिहास सांगतो. आता बऱ्याच प्रमाणात अनुकूल दिवस आले असून प्रतिकुल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची ताकद या ज्येष्ठ मंडळींमध्ये आहे. त्यांनी अपार मेहनत घेऊन, एकेक कार्यकर्ता पक्षात कसा टिकून राहील याची काळजी घेतली. त्यांनी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे, त्या सगळ्यांची मेहनत आता कामाला येत आहे असेही चव्हाण म्हणाले.

आयोजित मेळाव्यात पक्षाचे आतापर्यंत झालेले माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. त्यांना पन्नास हुन अधिक वर्ष होऊनही त्यांचे पक्षाबद्दल असलेले अपार प्रेम, आपुलकी पाहून मनाला उभारी मिळते, एकेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता हे ऊर्जा, स्फूर्तिस्थान आहे. आताच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्याकडून बरच शिकण्यासारखे आहे. ही ऊर्जा स्थान आहेत म्हणूनच आपण सगळे कार्यरत आहोत, त्या सगळ्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले आहे त्या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. पुन्हा एकदा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी त्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले असून शतप्रतिशद भाजप असे सांगून मला बळकटी दिली आहे. ते सगळे त्यांच्या स्तरावरून आत्ताही पूर्णपणे पक्षाचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी आश्वस्थ केले. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र चव्हाण किती ताकदीने मैदानात उतरणार आहेत हे लवकरच समोर येणार आहे.

BJP determined to keep Dombivli stronghold impregnable

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा उद्धव ठाकरेंना धक्का; शेकडो पदाधिकारी भाजपात

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मराठवाड्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे डोंबिवलीत आशावादी असलेल्या उद्धव ठाकरेंना चव्हाण यांनी डोंबिवलीतच धक्का दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही हा प्रवेश केला असून आम्हाला त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल प्रचंड आदर आहे. आम्ही त्यांचे काम पाहिले आहे. महाराष्ट्राला अशा नेत्याची गरज असून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आम्हीही आता मराठवाडयामध्ये सिल्लोड, नांदेड, उस्मानाबाद आदी सर्व भागात पक्ष वाढी, बळकटीसाठी झटणार असल्याचे राजपूत समाजाचे मराठवाडा येथील नेते माधव सिंह राजपूत उर्फ अशोक राठोड यांनी डोंबिवलीत आपले मत व्यक्त करताना सांगितले.

बदनापूर विधानसभेचे भाजपचे आमदार नारायण कुचे, कल्याण जिल्हा सरचिटणीस, १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर परब, दत्ता माळेकर यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने अनिल राठोड रामेश्वर काळे, योगेश ठोंबरे समाधान वाघ लहू तिडके सह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Minister Ravindra Chavan’s shock to Uddhav Thackeray; Hundreds of officials in BJP

कल्याण पश्चिम आमदार Vishwanath Bhoir यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन

Vishwanath Bhoir : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पंचवार्षिक विकास कामांच्या अहवालाचा सादरीकरण आणि प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अहवाल प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सादर करतांना पाच वर्षात सहकार्य केले त्याबद्दल माध्यमांचे आभार मानले.

मागील पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीची अडीच वर्ष ही कोव्हिड काळात गेली. तरीदेखील मी थांबलो नाही, तब्बल अडीच वर्षात मी शासनाकडून २०२३ कोटी रुपयांचा निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणला असून विकास कामे झपाट्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे भोईर यांनी सांगितले.

आयोजित अहवाल प्रकाशन सोहळ्याला शिवसेनेच्या छाया वाघमारे, उपनेत्या विजया पोटे, नेत्रा उगले, कल्याण जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे, संजय पाटील, प्रभूनाथ भोईर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, टिटवाळा ते कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात आमदारांनी विकास कामांची गंगा आणली, त्यात काँक्रिट रस्ते, नाले, गटार, अंतर्गत रस्ते, पायवाटा, उद्याने सुशोभिकरण तर स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक मोठ्या प्रकल्पांची विकास कामे केली आहेत. आमदारांनी प्रत्येक विभागात आणि प्रभागात न्याय देण्याचे काम केले आहे.

Publication of five year work report of Kalyan West MLA Vishwanath Bhoir

KDMC कर्मचाऱ्यांना दिवाळी Bonus जाहीर; मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

KDMC Bonus : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यंदाच्या दिवाळीत १९,५०० रुपयांचा बोनस जाहीर झाला असून त्यासंदर्भात अनेक कर्मचारी तसेच संघटना मला भेटल्या होत्या, त्या सगळयांचे म्हणणे ऐकून घेत शासनाकडे मांडून त्या सगळ्यांना आता बोनस जाहीर झाला असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या बोनस करिता चव्हाण यांनी राज्य सरकारशी चर्चा केली होती. त्यामुळे बोनस दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले. यंदा कर्मचाऱ्यांना १९,५०० एवढा बोनस जाहीर करण्यात आला असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना आदेश देण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.

कोविड काळातील पदभरती, २७ गावातील कर्मचारी अशा सगळ्यांनाच बोनस मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दिवाळीपूर्वीच सर्वांना बोनस वितरित होईल असेही ते म्हणाले. महानगरपालिका कर्मचारी वर्ग दरवर्षी भरघोस बोनस मिळावा यासाठी तळमळ व्यक्त करीत असतो. मात्र यंदा जाहीर झालेल्या बोनस नंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Diwali Bonus announced to KDMC employees

विधानसभा निवडणुक तयारीच्या अनुषंगाने भाजप कोअर कमिटीची दिल्लीत बैठक संपन्न; मंत्री रवींद्र चव्हाणांची उपस्थिती

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुक तयारीच्या अनुषंगाने राज्याच्या भाजप कोअर कमिटीची बैठक सोमवारी मुंबईत संपन्न झाली. त्यानंतर दिल्ली मध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री रविंद्र चव्हाण आणि अन्य मंत्री मंडळी व केंद्राच्या कोअर कमिटी समवेत एक बैठक पार पडली. या दोन्ही बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सोमवारी चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आदींनी मार्गदर्शन केले. कोकणच्या दृष्टीने निवडणूक संदर्भात मुद्यांवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली, त्यावर सखोल चर्चा झाली. कोकण पट्ट्यातील ४८ विधानसभांबाबत माहिती देऊन सद्यस्थिती यावेळी सांगण्यात आली.

आयोजित बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असून निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे.

BJP core committee meeting concluded in Delhi in connection with assembly election preparations

डोंबिवली मधील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न; मंत्री Ravindra Chavan यांनी केलं संबोधित

Ravindra Chavan : रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री Ravindra Chavan यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला होता. मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.

भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दर्शवले.

भाजपच्या १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये हा मेळावा संपन्न झाला. निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Minister Ravindra Chavan delivered a speech

Kalyan पूर्वेतील Shivsena उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मशाल ठेऊन उचलला धनुष्यबाण

Kalyan Shivsena : कल्याण पूर्वेत नुकतेच शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शिवसेना उबाठा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख ल गोपाळ लांडगे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा झेंडा खांद्यावर देऊन त्यांचे पक्षामधे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख सत्यवान खेडेकर, उप विभागप्रमुख व माजी सैनिक संघटना कल्याण शहर अध्यक्ष अनंत आंबरे, उप विभागप्रमुख महेंद्र एटमे, उप शाखाप्रमुख प्रकाश यादव, विकास कदम, राहुल मोरे, महेश नाईक, युवासेनेचे तन्मय एटमे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा देऊन आपला पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल आणि आपणास चांगले काम करण्याची संधी मिळेल आपण त्या संधीचं सोन कराल असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी युवासेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख जितेन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, महिला उप जिल्हासंघटक व माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, महिला विधनसभा संघटक पल्लवी बांदिवडेकर, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, विभागप्रमुख संतोष साळवी, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, वासुदेव कदम, प्रदीप तांबे यांच्यासह कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक/नगरसेविका त्याचबरोबर पक्षाचे असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shivsena UBT party workers from Kalyan East join Shiv Sena